राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड शहरात एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात केवळ 12 तासांच्या आत 2 आरोपींना अटक करून मोठी कामगिरी केली आहे. याबाबत दौंड पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमन किसन शिंदे, वय 70 ( रा. आर.बी. १ नगरमोरी, दौंड) या ज्येष्ठ महिला चा धारधार शस्त्राने खुन झाल्याची घटना पोलीस बुधवारी दि. 19 ) रोजी दुपारी 03:15 वाजण्याच्या सुमारास घडली.
मयत महिलेची मुलगी तृप्ती सचिन हिरवे ( वय 45, रा. रामलिंग रोड, शिरूर ) यांना त्यांचे मामा अशोक धोंडीबा पोळ यांनी फोन करून खुनाची माहिती दिली. फिर्यादी आपल्या पतीसह दौंड उपजिल्हा रुग्णालयात गेल्या असता त्यांनी मृतदेहाची ओळख आपली आई म्हणून पटविली. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात आरोपीने धारदार हत्याराने गळ्यापासून शिरच्छेद करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शिर वेगळ्या ठिकाणी नेऊन टाकले.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनासह गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन दौंड पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकाने केलेल्या तपासादरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. विकी उर्फ विक्रम धनराज अल्हाट, (रा. समतानगर, दौंड) व प्रसाद बाबूलाल चव्हाण, (रा. आर.बी. १ नगरमोरी, दौंड) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत.
चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकरे हे करीत आहेत. दौंडचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, विनायक सपाटे, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, ज्ञानेश्वर राऊत, सहाय्यक फौजदार आसिफ शेख, सचिन घाडगे, पांडुरंग थोरात, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे, नितीन बोराडे, धनंजय गाढवे, निखिल जाधव, आमिर शेख, किरण पांढरे, महेंद्र लोहार, पवन माने, सोमनाथ चौंडे, निखील पवार, हजारे, अक्षय कुंभार, ओमनाथ तुमकुटे, तांबोळी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास सुरू असून हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली.










