• Contact us
  • About us
Monday, July 6, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत कागदपत्रांविना धोकादायक रसायनाची वाहतूक! ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल!

mahaanewslive by mahaanewslive
July 1, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महाराष्ट्र
0
बारामतीत मोठी फसवणूक उघड? बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा; गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन!

दौंड : महान्यूज लाईव्ह

कुरकुंभ MIDC परिसरात बिनपरवानगीने धोकादायक रसायनाची वाहतूक करणाऱ्या टाटा ट्रक चालकाविरुद्ध दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पर्यावरण आणि मानवी आरोग्यास धोका निर्माण होईल, अशा प्रकारे वाहतूक केल्याचा आरोप आहे. प्रकाश महाद साळवे, (वय 43 रा. गजानन सोसायटी, दौंड ) या वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून
मंगळवारी (दि 30 ) सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास

कुरकुंभ MIDC, मधुमालती इंडस्ट्रीजसमोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुरकुंभ MIDC परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाला टाटा ट्रक( क्र. (MH-12-HD-5106) संशयास्पदरित्या आढळला. वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात रासायनिक टाक्या होत्या. चालक प्रकाश साळवे याने सांगितले की, टाक्यांमध्ये Mix Solvent आहे आणि ते TRIMURTI PHARMA, कुरकुंभ MIDC येथून बाहेर आणले आहे.

मात्र, धोकादायक रसायन वाहतुकीसाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची MPCB परवानगी, वाहतूक कागदपत्रे किंवा इतर कोणतीही वैध कागदपत्रे त्याच्याकडे नव्हती. तसेच केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार आवश्यक सुरक्षा उपाय न करता वाहतूक केल्याचे आढळून आले.याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अंकुश दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी वाहन चालक प्रकाश साळवे याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच्यावर मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार वाहन नियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. धोकादायक रसायनांची बेकायदेशीर वाहतूक हा मोठा धोका असल्याने MIDC परिसरात अशा वाहनांवर कडक लक्ष ठेवले जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Next Post
माऊलींच्या गावात अनैतिकतेचा बाजार… भाऊबहिणीचं देखील लग्न लावून देऊ लागलेत आळंदीवाले..!

आळंदीत ४ ते ९ जुलैदरम्यान विवाह सोहळ्यांना स्थगिती..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

स्टिंग पेयावर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शाळांपासून अर्धा किलोमीटर परिसरात विक्रीस बंदी

July 3, 2026
वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

July 3, 2026
दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

July 3, 2026

ग्वाल्हेरमध्ये पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या लड्डू गोपालच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त

July 3, 2026
बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

July 2, 2026
बारामतीच्या ग्रामीण भागात दररोज ४ तास भारनियमन; नागरिक त्रस्त, संताप वाढला!

महावितरणच्या नव्या स्मार्ट मीटरविरोधात ४ जुलै रोजी इंदापूर बंदचे आवाहन!

July 2, 2026
मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

July 2, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

दौंडच्या खुटबावमधील दुहेरी खून प्रकरण! आरोपीला बारामती सत्र न्यायालयाची जन्मठेप!

July 2, 2026
26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

July 2, 2026
बारामतीत मोठी फसवणूक उघड? बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा; गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन!

इंदापूर नगरपरिषदेसमोर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला; प्रसंगावधानामुळे बचाव, एक जखमी

July 2, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group