• Contact us
  • About us
Friday, June 26, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटस परिसरातील तब्बल १५ ठिकाणी अवैध हातभट्टी दारूचे अड्डे! तात्काळ कारवाईची संभाजी ब्रिगेड ची मागणी! यवत पोलीसांना निवेदन!

mahaanewslive by mahaanewslive
June 24, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, मनोरंजन, मराठवाडा, महाराष्ट्र
0
पाटस परिसरातील तब्बल १५ ठिकाणी अवैध हातभट्टी दारूचे अड्डे! तात्काळ कारवाईची संभाजी ब्रिगेड ची मागणी! यवत पोलीसांना निवेदन!

दौंड : महान्युज लाईव्ह

यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस पोलीस चौकीच्या हद्दीत ठिकठिकाणी तब्बल १५ ते १८ अवैध हातभट्टी दारू चे अड्डे असुन खुलेआम लोकवस्तीत हे व्यवसाय सुरू आहेत. हे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली असून यासंदर्भात यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

मागील काही वर्षांपासून पाटस गावच्या हद्दीत डोंगरेश्वर नगर, (तामखडा) भानोबा नगर, अंबिका नगर, पाटस रेल्वे स्टेशन, दत्तनगर , मधुकर नगर तसेच सिमेंट कंपनी परिसर तसेच इतर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टी दारूचे व्यवसाय सुरू आहेत . तर काही ठिकाणी हातभट्टी गावठी दारू तयार करण्याच्या भट्टी आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. या बेकायदेशीर धंद्यांमुळे अनेक युवक व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्तरावर गंभीर परिणाम होत आहेत.”

“राज्यात नुकत्याच घडलेल्या विषारी हातभट्टी दारू प्रकरणात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाटस परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायांकडे दौंड राज्य उत्पादन शुल्क विभाग व यवत पोलीसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मात्र या प्रकाराकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

पोलीसांनी संबंधित ठिकाणी तात्काळ धाडी टाकून संबंधित अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या व्यवसायांना संरक्षण देणारे अथवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात यावी.” अशी मागणी संभाजी ब्रिगेडने निवेदनात केली आहे.

पुढील आठ दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाटस परिसरातील ग्रामस्थ, युवक व महिला भगिनींना सोबत घेऊन यवत पोलीस स्टेशनसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला.

याप्रसंगी शिवाजी साळुंके, मिथुन चव्हाण, इमरान खान, शंकर पवार, सोनबा देशमुख तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले, अवैध हातभट्टी दारू व्यवसायांमुळे परिसरातील तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने व्यापक मोहीम राबवून अशा सर्व अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group