• Contact us
  • About us
Friday, September 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अज्ञात वाहनाची धडक; वाईच्या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी श्रावण राठोड यांचा मृत्यू! मात्र हा अपघात की घातपात?

mahaanewslive by mahaanewslive
June 19, 2026
in सामाजिक, सुरक्षा
0
अज्ञात वाहनाची धडक; वाईच्या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी श्रावण राठोड यांचा मृत्यू! मात्र हा अपघात की घातपात?

दौलतराव पिसाळ, वाई

वाई-सातारा मार्गावरील वाकेश्वर-बावधन हद्दीत पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वाई पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष व धाडसी पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा दुर्दैवी अपघात घडल्याने पोलीस दलासह संपूर्ण वाई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल श्रावण राठोड हे आपल्या पत्नीसह वाई-पाचवड मार्गावरून प्रवास करत होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्यातील डीबी विभागात कार्यरत होते. गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांची विशेष कामगिरी होती. कर्तव्यनिष्ठ, धाडसी आणि नागरिकांशी आत्मीयतेने वागणारे पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वाई पोलीस ठाण्यासह सातारा जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली. सहकारी अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, अपघात घडवून अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संबंधित वाहनाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कर्तव्य बजावत असताना अनेक गुन्ह्यांचा तपास लावणारे आणि पोलीस दलाचा आधारस्तंभ मानले जाणारे श्रावण राठोड यांच्या अकाली निधनामुळे पोलीस दलाने एक धाडसी व समर्पित सहकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

हा खरंच योगायोगाने झालेला अपघात की जाणीवपूर्वक घातपात?

दरम्यान वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रावण राठोड यांच्या अपघातानंतर लोकांमध्ये शंकेची पाल चुकचुकली आहे. श्रावण राठोड हे कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज पोलीस कर्मचारी होते. अनेक गंभीर आणि गहन गुन्ह्यांचा त्यांनी अत्यंत कौशल्याने तपास करताना महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्हेगारीची उकल करताना नेहमीच अनेकांचा रोषही त्यांनी पत्करला. कर्तव्य भावना श्रेष्ठ म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी कामाला महत्व दिले. साहजिकच त्यांचे हितशत्रू देखील मोठ्या प्रमाणावर होते.. आज झालेल्या अपघातामुळे या हितशत्रूंनीच हा प्रकार केला असावा का असा देखील संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस दलाने या दृष्टीने देखील तपास करावा अशी मागणी नागरिकांची आहे.

Next Post
मान्सूनची चाहूल कधी? शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जय पवारांची हवामान केंद्रात धाव

मान्सूनची चाहूल कधी? शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जय पवारांची हवामान केंद्रात धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group