• Contact us
  • About us
Sunday, June 21, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलांचा रक्तरंजित सूड! ओट्यावर झोपलेल्या इसमाचा गळा चिरून निर्घृण खून; ३६ तासांत मारेकरी जेरबंद

mahaanewslive by mahaanewslive
June 10, 2026
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
अल्पवयीन मुलांचा रक्तरंजित सूड! ओट्यावर झोपलेल्या इसमाचा गळा चिरून निर्घृण खून; ३६ तासांत मारेकरी जेरबंद

शिरूर, दि. १० : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर ओट्यावर झोपलेल्या एका इसमाचा धारदार कोयत्याने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या खुनामुळे संपूर्ण परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शिक्रापूर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या ३६ तासांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरूडे येथील रानमळा परिसरात राहणारे बाळासाहेब बबन तांबे (वय ४३) हे उकाड्यामुळे ८ जून रोजी रात्री घराबाहेरील ओट्यावर झोपले होते. पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर धारदार कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. खुनामागील कारण आणि आरोपीचा कोणताही स्पष्ट मागमूस नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र तपास पथकाने मयताच्या हालचाली, पूर्वीचे वाद, गावातील सामाजिक संबंध तसेच संशयित व्यक्तींची माहिती बारकाईने तपासली.

तपासादरम्यान पोलिसांना गावातीलच एका अल्पवयीन मुलाबाबत संशय आला. त्यानंतर संबंधित मुलाची पालकांच्या उपस्थितीत सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने खुनाची धक्कादायक कबुली दिली. पोलिसांच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी मयत बाळासाहेब तांबे आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता.

त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवीगाळ आणि धमकीच्या घटनेमुळे आरोपीच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला होता. याच रागातून सूड उगवण्याचा निर्धार करून त्याने खुनाचा कट रचला. तांबे हे घराबाहेर झोपल्याची संधी साधत आरोपीने मध्यरात्री त्यांच्या गळ्यावर कोयत्याने वार केले आणि घटनास्थळावरून पसार झाला.

पोलिसांनी आरोपीकडून खुनासाठी वापरण्यात आलेला लोखंडी कोयता जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे आणि त्यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे.

अवघ्या ३६ तासांत गुन्ह्याचा उलगडा..
वरूडे येथील खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही ठोस पुरावा हाती नसताना शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास, गुप्त माहिती संकलन आणि बारकाईच्या चौकशीच्या आधारे आरोपीपर्यंत मजल मारली. त्यामुळे अवघ्या ३६ तासांत खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली. तपास पथकात प्रमोद क्षिरसागर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), चंद्रशेखर यादव (पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस स्टेशन), महेश डोंगरे (पोलीस उपनिरीक्षक), जितेंद्र पानसरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे जनार्धन शेळके, राजू मोमीन, तुषार पंदारे, संजू जाधव, सागर धुमाळ आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनचे विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, अमोल नलगे, प्रतीक जगताप, नारायण वाळके, राम जाधव व मच्छिंद्र निचीत यांचा समावेश होता. या धक्कादायक खुनाचा अवघ्या ३६ तासांत उलगडा झाल्याने पोलिसांच्या तपास कौशल्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

Next Post
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

बारामतीत नामांकित कंपनीच्या उत्पादनाची नक्कल उघड; 82 हजारांचा संशयित बनावट माल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group