दौंड : महान्यूज लाईव्ह
आज दौंड शहर व स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर मध्ये 9 जणांचे अहवाल हे कोरोना पॅाझिटिव्ह आले आहेत.
दौंड तालु्क्यात मागील काही दिवसापासून कोरोना बाधीत रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. उपचार घेवून घरी जाणाऱ्या रूग्णांचे प्रमाण ही वाढले आहे.
शहरातील कोवीड सेंटर मध्ये आज गुरूवारी ( दि. 8 ) आज प्राप्त झालेल्या अहवालात 42 पैकी 7 जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह तर 35 जण निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये 33 ते 60 वयोगटातील 4 महिला व 3 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. दौंड शहरात 2 व ग्रामीण भागात 5 असे एकूण 7 नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत अशी माहिती उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर मध्ये आज 9 जणांची तपासणी केली, यापैकी दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मलठण आणि लोणारवाडी या गावांत प्रत्येकी एक असे दोन नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली.










