• Contact us
  • About us
Friday, June 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यवत पोलीस ठाण्याचा अधिकारी बदलला.. आता वादांच्या छायेत असलेल्या कारभाराला पूर्णविराम मिळणार?

mahaanewslive by mahaanewslive
June 8, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
बारामतीत दारू माफियांवर मोठी कारवाई; बांदलवाडीत हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त, अडीचशे लिटर रसायन नष्ट

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
पुणे ग्रामीण पोलीस दलातील नुकत्याच झालेल्या मोठ्या बदल्यांमध्ये यवत पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध वाद, गंभीर घटना आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांमुळे चर्चेत राहिलेल्या यवत पोलीस ठाण्याला आता नवे कारभारी मिळाले असून, या बदलामुळे पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच परिसरातील नागरिकांमध्येही विविध चर्चांना उधाण आले आहे.

यवत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही काळात अनेक संवेदनशील घटना घडल्या. त्यामध्ये सांप्रदायिक तणाव निर्माण होऊन दंगलसदृश परिस्थिती उद्भवणे, एका पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोट लिहून बेपत्ता होण्याचा प्रकार, तसेच वाढती गुन्हेगारी यामुळे पोलीस प्रशासनावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. विशेषतः एका पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रकरणानंतर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर विविध स्तरांतून टीका झाली होती. या घटनेनंतर पोलीस दलातील वातावरण, वरिष्ठांशी असलेले संबंध आणि अंतर्गत व्यवस्थापन याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. काही संघटनांनी आणि नागरिकांनी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, जुगार अड्डे, अवैध मद्यविक्री तसेच महामार्गालगत सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवायांबाबत वारंवार तक्रारी होत होत्या. यासंदर्भातील काही तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचल्याची चर्चा होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत होते.

याच पार्श्वभूमीवर ५ जून रोजी पाटस परिसरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण दौंड तालुका हादरला. सिमेंट वाहतूक ठेक्याच्या वादातून झालेल्या या गँगवॉरमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या घटनेनंतर वरिष्ठ पातळीवरून परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या आदेशानुसार झालेल्या बदल्यांमध्ये यवत पोलीस ठाण्याच्या प्रमुख पदावरही बदल करण्यात आला. आता या ठिकाणी संतोष वसंत तासगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील अनुभव असलेले तासगावकर हे शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून ओळखले जातात.

आता नवीन नेतृत्वासमोर यवत-पाटस परिसरातील वाढती गुंडगिरी, गँगवॉर, अवैध धंद्यांवर नियंत्रण आणि नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेवरील विश्वास पुनर्स्थापित करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या काही महिन्यांत निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा बदलून कायदा-सुव्यवस्थेला बळकटी देण्याची अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. नेतृत्वबदलानंतर पोलीस ठाण्याच्या कारभारात नेमका किती फरक पडतो आणि परिसरातील गुन्हेगारीवर कितपत प्रभावी नियंत्रण मिळवले जाते, याकडे आता यवत-पाटस परिसरासह संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Next Post
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांना प्रशासक नेमण्याचा निर्णय रद्द; निवडणुका तातडीने घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश!

तुकाराम मुंढे यांची धास्ती तर घेतल, पण चौफुल्यावर अवैध गुऱ्हाळचालकांची बैठक! भेसळयुक्त गूळ दारूसाठी चालू ठेवण्याचा निर्धार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group