• Contact us
  • About us
Sunday, June 14, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटस गोळीबार प्रकरणात 18 जणांवर गुन्हे दाखल! 10 आरोपींना अटक! माजी सरपंचांचे ट्रान्सपोर्ट ऑफिस वादाच्या केंद्रस्थानी!

mahaanewslive by mahaanewslive
June 6, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
पाटस गोळीबार प्रकरणात 18 जणांवर गुन्हे दाखल! 10 आरोपींना अटक! माजी सरपंचांचे ट्रान्सपोर्ट ऑफिस वादाच्या केंद्रस्थानी!

राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह

दौंड : सिमेंट वाहतूक करणाऱ्या वाहने भरण्याच्या वादातून भरदिवसा झालेल्या हाणामारी आणि गोळीबार प्रकरणात यवत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील तब्बल 18 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

शुक्रवारी ( दि. 5 जून ) रोजी पाटस येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लक्ष्मी बापू गरदडे कॉम्प्लेक्स समोर दुपारी तुफान राडा झाला. श्री सिमेंट कंपनीत ट्रक भरण्याच्या कारणावरून “कडू गट” आणि “कु-हाडकर गट” आमने-सामने आले. वाद विकोपाला जाऊन लोखंडी गज आणि दगडांनी डोक्यात मारहाण झाली. यानंतर गावठी पिस्तूलमधून 3 राऊंड हवेत फायर करण्यात आले.

घटनेनंतर यवत पोलीस, पाटस पोलीस आणि ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्त मोहीम राबवली. आरोपींना उसाच्या शेतातून आणि इतर भागातून शोधून 10 जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही गटांकडून परस्पर तक्रार दाखल झाल्याने एकूण 18 जणांवर यवत पोलीस ठाण्यात BNS कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कडू गटाचे संतोष बाळकृष्ण कडू ( रा. बेटवाडी ता.दौंड जि‌.पुणे ), आण्णा बाबू गायकवाड, रावसाहेब गंगाराम पालवे, सुधीर आण्णा फुलमाळी, रामा बाजीराव गायकवाड, अनिल रामा गायकवाड (सर्व रा. जोशीवस्ती ढोकराई फाटा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) व इतर 4 ते 5 अनोळखी. तर कु-हाडकर गटाचे सूरज राजेंद्र कु-हाडकर, अजय धोत्रे, श्रीकांत पवार, अनिल चव्हाण (सर्व रा. अंबिकानगर पाटस ता‌.दौंड जि.पुणे ) व इतर 3 ते 4 अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सूरज कु-हाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वाद मिटवण्यासाठी चर्चेसाठी बसले असताना बेकायदेशीर जमा जमवून लोखंडी गदेने व दगडाने डोक्यात मारहाण करून जखमी करून शिवीगाळ, दमदाटी केली तर भांडणे मिटवण्यासाठी चर्चेसाठी बोलावून घेऊन शिवीगाळ दमटाटी करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अजय धोत्रे याने गावठी कट्टयाने संतोष कडूच्या दिशेने गोळीबार केला. अशी फिर्याद संतोष कडू यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे.

दरम्यान, या घटनेने नवीन वळण घेतले आहे. लक्ष्मी बापू गरदडे कॉम्प्लेक्समध्येच पाटसच्या एका माजी सरपंचांचे सिमेंट कंपनीच्या वाहनांचे ट्रान्सपोर्ट कार्यालय आहे. आरोपी याच कार्यालयात आले होते का? वादाची ठिणगी इथूनच पडली का? सिमेंट कंपनीचा ट्रान्सपोर्ट करणारा ठेकेदारच या गोळीबाराचा मुख्य सूत्रधार आहे का? श्रीगोंदा तालुक्यातील गुंडप्रवृत्तीची टोळी कोणी बोलावली होती? असे अनेक प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोल्हे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. आणखी आरोपी आहेत का याचा शोध सुरू आहे. दरम्यान, पाटस ग्रामस्थांनी पोलिसांकडे निपक्षपाती आणि पारदर्शक तपास करून खरी मुखवटे उघड करावेत अशी मागणी केली आहे.
गोळीबारानंतर पाटसमध्ये निर्माण झालेला तणाव आता पोलिसांच्या कारवाईने काहीसा कमी झाला आहे. मात्र ट्रान्सपोर्ट, सिमेंट लॉबी आणि गुन्हेगारी यांचा संबंध समोर आल्याने गावात चर्चेचा विषय बनला आहे. ह्या प्रकरणाच्या मुळाशी असलेले ट्रान्सपोर्ट आणि कॉन्टॅक्टर चे राजकारण उघडे होणे गरजेचे आहे. सध्या सिमेंट कंपनीच्या वाढती गुन्हेगारी पाटस करांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group