केबीसी -१२ मधून महाराष्ट्राच्या कन्येने जिंकले 12 लाख..!
मुंबई :महान्युज लाईव्ह
आई-वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन करण्याची जिद्द मनाशी बाळगून ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झालेल्या लातूरच्या अस्मिता माधव गोरेने 12 लाख 50 हजार रुपये जिंकले आहेत.
आता आई-वडिलांच्या डोळ्याचे ऑपरेशन आणि बहीण-भावांचं शिक्षण पूर्ण करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे.अस्मिताच्या संघर्षमय प्रवासाने कोरोनावर मात करुन आलेले महानायक अमिताभ बच्चन देखील भावूक झालेले दिसले.
अमिताभ बच्चन यांनी शोमध्ये अस्मिताला 25 लाख रुपयांचा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर अस्मिता देऊ शकली नाही. त्यामुळे तिने तेथेच खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.











