• Contact us
  • About us
Monday, August 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोणावळ्यातील वॉटर पार्कमधील तोच सेल्फी ठरला शेवटचा; पिंपळीतील सनी यादवच्या अचानक निधनाने बारामतीकर सुन्न!

tdadmin by tdadmin
May 20, 2026
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
लोणावळ्यातील वॉटर पार्कमधील तोच सेल्फी ठरला शेवटचा; पिंपळीतील सनी यादवच्या अचानक निधनाने बारामतीकर सुन्न!

बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील पिंपळी गावचा रहिवासी असलेल्या २८ वर्षीय सनी तानाजी यादव याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण बारामती तालुक्यावर शोककळा पसरली आहे. लोणावळ्यात मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या सनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, त्याच्या मृत्यूमागे उष्माघात की हृदयविकाराचा तीव्र झटका हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

काही दिवसांपूर्वीच बारामतीतील २३ वर्षीय तरुणाच्या अकस्मात मृत्यूची घटना ताजी असतानाच आता सनी यादवच्या निधनाने परिसर सुन्न झाला आहे. सनी आपल्या मित्रांसोबत लोणावळ्यातील एका वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांनी वॉटर पार्कमधील बंदिस्त पाईपलाईनजवळ एक व्हिडिओ आणि सेल्फी घेतल्याचे समोर आले आहे. हाच व्हिडिओ आता त्याचा शेवटचा ठरल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.

वॉटर पार्कमधील साहसी खेळांचा आनंद घेत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे. एरवी तरुणाईचा उत्साह आणि आनंदाचे प्रतीक असणारे हे वॉटर पार्कचे दृश्य एका कुटुंबासाठी कायमचे दुःख देऊन गेले.

सनी यादव हा पिंपळी येथील तानाजी यादव यांचा मुलगा असून तो हौशी छायाचित्रकार म्हणून परिसरात परिचित होता. मनमिळावू स्वभाव, मित्रपरिवारातील लोकप्रियता आणि आर्थिकदृष्ट्या गरजू लोकांना वेळोवेळी केलेली मदत यामुळे त्याने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यामुळे त्याच्या अचानक जाण्याने पिंपळी गावासह बारामती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Next Post
जन्माआधीच कोवळ्या कळ्यांचा बळी देण्याचा कारनामा..! राहता येथे गर्भलिंग तपासणी रॅकेट उघड, डॉक्टर- एजंट रंगेहाथ जाळ्यात!

अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी दौंड तालुक्यातील केडगावात एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group