• Contact us
  • About us
Friday, July 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमआरपी कायद्यात तातडीने सुधारणा करा; पारदर्शक किंमत निर्धारण प्रणाली लागू करण्याची मागणी

tdadmin by tdadmin
May 12, 2026
in सामाजिक, सुरक्षा, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
एमआरपी कायद्यात तातडीने सुधारणा करा; पारदर्शक किंमत निर्धारण प्रणाली लागू करण्याची मागणी

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे केंद्र सरकारला निवेदन

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने देशातील सध्याच्या एमआरपी (Maximum Retail Price) व्यवस्थेमध्ये तातडीने सुधारणा करून पारदर्शक किंमत निर्धारण प्रणाली लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री तसेच केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाला निवेदन सादर करण्यात आले आहे.

संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, सध्या उत्पादक कंपन्यांना कोणतीही स्वतंत्र सरकारी तपासणी, वैज्ञानिक खर्च पडताळणी किंवा वस्तुनिष्ठ किंमत निर्धारण यंत्रणा नसताना मनमानी व फुगवलेली एमआरपी छापण्याची मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतने नमूद केले की, विद्यमान Legal Metrology Act, 2009 आणि Consumer Protection Act, 2019 या कायद्यांमध्ये केवळ छापील एमआरपीपेक्षा जास्त दर आकारण्यास बंदी आहे. मात्र एमआरपी निश्चित करण्यासाठी कोणतीही प्रभावी नियंत्रण व्यवस्था अस्तित्वात नाही.

या कायदेशीर त्रुटींमुळे बाजारात कृत्रिम दरवाढ, खोटे डिस्काउंट आणि ऑफर, अवास्तव नफेखोरी, उत्पादन खर्चातील अपारदर्शकता आणि ग्राहकांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. विशेषतः औषधे, सौंदर्य प्रसाधने, पॅकेज्ड खाद्यपदार्थ, ऑनलाइन विक्रीतील वस्तू आणि दैनंदिन वापराच्या उत्पादनांमध्ये उत्पादन खर्चाच्या अनेक पटींनी एमआरपी आकारला जात असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.

ग्राहक पंचायतीने केलेल्या प्रमुख मागण्या : प्रत्येक उत्पादनावर उत्पादन खर्च (Cost of Production) छापणे बंधनकारक करावे. एमआरपीसाठी वैज्ञानिक व पारदर्शक किंमत निर्धारण सूत्र लागू करावे. एमआरपी पडताळणीसाठी स्वतंत्र वैधानिक प्राधिकरण स्थापन करावे. खोटे डिस्काउंट आणि फुगवलेल्या एमआरपीवर कठोर कारवाई करावी

औषधे व अत्यावश्यक वस्तूंवर विशेष किंमत नियंत्रण लागू करावे. संसदेत चर्चा करून राष्ट्रीय ग्राहक किंमत धोरण तयार करावे. संस्थेने स्पष्ट केले की, ग्राहकांना उत्पादनाची वास्तविक किंमत रचना जाणून घेण्याचा मूलभूत अधिकार असून अन्यायकारक किंमत पद्धतींपासून संरक्षण मिळाले पाहिजे.

या विषयावर देशभरात जनजागृती मोहीम, पत्रकार परिषद, सोशल मीडिया अभियान आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करण्यात आले असून, २५ मे २०२६ रोजी जंतर-मंतर येथे राष्ट्रीय स्तरावरील आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

कोट्यवधी भारतीय ग्राहकांच्या हितासाठी केंद्र शासनाने तातडीने कायदेशीर आणि धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष तुषार झेंडेपाटील, उपाध्यक्ष दिलावर तांबोळी, विधी आयाम प्रमुख श्रीकांत जोशी, श्रीपत थोरात, तुकाराम फराटे आदी उपस्थित होते.

Next Post
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरून राजकीय गोंधळ; पटेल, तटकरे यांची नावं गायब, सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group