डॉ चंद्रकांत पिल्ले, बारामती
छत्रीधारी अ-शोक
‘रुपा’ला भाळला
भोंदूगिरीचा खरा(त)
पदर त्याने ढाळला!
महिला आयोग याच्या
म्हणे दिमतीला आहे
नावलौकिक इथे आता
फक्त किमतीला आहे!
वासनांचे किती महागुरू
भक्तीचा बाजार मांडतात
नेत्यांचे बळ वापरून
अश्लीलतेचा व्यापार सांधतात!
कॅप्टनच बाद झाला
टीम अडचणीत आहे
कित्येक स्त्रियांचे शील
याच्या वळचणीत आहे!
हाही सुटेल निर्दोष
याचेही पाप धुतले जाईल
क्लीनचिट देऊन याला
आपल्या पक्षात घेतले जाईल!











