• Contact us
  • About us
Saturday, April 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठरलं एकदाचं! ग्रामपंचायत वर प्रशासक कोण? अहो, सरपंचच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!

tdadmin by tdadmin
February 21, 2026
in यशोगाथा, मराठवाडा, महिला विश्व, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, Featured
0
ठरलं एकदाचं! ग्रामपंचायत वर प्रशासक कोण? अहो, सरपंचच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचं राज्य सरकारने जाहीर केलं होतं. मात्र विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित संख्या लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत प्रशासकपदाचा गुंता सोडवला आहे. आता ज्या ग्रामपंचायतींची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत संपत आहे, त्या ठिकाणी विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. यामुळे ग्रामपातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार आहे.

याआधी जानेवारी महिन्यात काढलेल्या परिपत्रकानुसार, 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, राज्यातील ग्रामपंचायतींची मोठी संख्या आणि विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता प्रशासनासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने सुधारित निर्णय घेतला आहे

सरपंचच प्रशासक..! उपसरपंच आणि सदस्यांची समिती मदतीला

नव्या निर्णयानुसार,ग्रामपंचायतीची मुदत संपण्याच्या दिवसापर्यंत जे सरपंच पदावर असतील, त्यांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात येईल. त्यांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन केली जाणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होईल आणि नव्या व्यक्तींना प्रशासन समजून घेण्यासाठी लागणारा वेळ वाचेल.

प्रशासकाचा कालावधी किती?

प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कालावधी त्यांच्या नेमणुकीपासून सहा महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्ण होईपर्यंत, जे आधी होईल तेवढा राहणार आहे. हा तात्पुरता उपाय असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच नियमित निवडून आलेले पदाधिकारी कारभार स्वीकारतील.

28 फेब्रुवारीपर्यंतच लागू निर्णय

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय सध्या 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीच लागू राहणार आहे. या कालावधीत प्रशासक आणि प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असतील.

प्रशासनातील अडचणी टाळण्यासाठी बदल

राज्यातील मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने सर्वत्र बाहेरील प्रशासक नेमणे व्यवहार्य ठरणार नव्हते. पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित संख्या ही देखील मोठी अडचण होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सरकारने स्थानिक स्तरावरच विद्यमान सरपंच आणि त्यांच्या टीमकडे तात्पुरता कारभार सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनात सातत्य, पारदर्शकता आणि वेग राखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Next Post
मारायचं होतं सासूला; पाण्यात विषही मिसळलं; पण नवराच मेला..! पंढरपूर तालुक्यातील उंबरगावचा विषप्रयोग! प्रियकराला अटक!

मारायचं होतं सासूला; पाण्यात विषही मिसळलं; पण नवराच मेला..! पंढरपूर तालुक्यातील उंबरगावचा विषप्रयोग! प्रियकराला अटक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 18, 2025
तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

December 18, 2025
चौफुला येथे रेणुका कला केंद्रात लावणी वरुन राडा! पाटसच्या एकावर कोयत्याने सपासप वार!

बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप! बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; नात्यातील ताण, लोभ आणि कटाची भयावह कहाणी उघड!

December 17, 2025
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

December 17, 2025
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

December 17, 2025
बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

December 17, 2025
असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार? भावाच्या साताऱ्यातील रिसॉर्टवर 145 कोटींचं ड्रग्स सापडलं! साताऱ्याच्या एसपीने एकनाथ शिंदे यांच्या भावाला का वगळलं? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप! 

December 17, 2025
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

December 17, 2025
जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

December 17, 2025
माळेगाव साखर कारखान्याचा मागील हंगामासाठी ३४५० रुपये प्रतिटन अंतिम दर जाहीर!

हे पहिल्यांदा घडतंय.. छत्रपती कारखान्याचे कामगार आणि ऊसतोड मजूरच नव्हे; तर संचालक आणि सभासदही रात्रभर जागे आहेत! असं काय घडलंय?

December 17, 2025
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group