महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
महाराष्ट्रातील शाळा कधी उघडणार हा घोळ अजूनही सुरूच आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र आज अमरावतीत बोलताना दिवाळीनंतर नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचे सुतोवाच केले. फक्त नर्सरी, पहिली ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे ते म्हणाले.
सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा पहिला विचार शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बोलून दाखवला, मात्र तेव्हा राज्यात कोरोनाचा प्रभाव तेवढा नव्हता. मात्र सप्टेंबरपूर्वी कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय अनिर्णित ठेवण्यात आला. आता कडू यांनी नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील असे स्पष्ट केले आहे. सध्या सर्वांचेच ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शाळा बंद आहेत, मात्र शिक्षण सुरू आहे, ते प्रत्यक्ष सुरू होईल, त्याची राज्य शासन तयारी करीत असल्याचे कडू यांनी सांगितले.











