बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत काल शासकीय आरटीपीसीआर २७८ नमुन्यांच्या झालेल्या तपासणीत १११ अजून प्रलंबित आहेत, १६५ नमुन्यांमध्ये ३४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. म्हणजेच तपासलेल्या नमुन्यांपैकी साधारणतः २० टक्क्यांपर्यंत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. हे प्रमाण जनता कर्फ्यूपूर्वी तब्बल ३३ टक्के होते, मात्र जनता कर्फ्यूनंतर १५ टक्क्यांवर घसरले होते. आता ते पुन्हा हळूहळू वाढत चालले आहे. त्यामुळे बारामती शहरासह तालुक्यातील नागरिकांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे. याचा अर्थ सरळ असा आहे की, रस्त्यावर याल, तर कोरोना तुम्हाला गाठणार आहे.. बारामतीत कोरोना कासवगतीने पुन्हा वाढत असून त्याचा गुणाकार वाढत चालला आहे. हाच या दोन दिवसांचा धडा आहे. कालही बारामतीत सत्तरीच्या आसपास कोरोनाग्रस्तांचा समावेश होता..आजही तशीच परिस्थिती आहे.. चाळीशी- पन्नाशीच्या आत राहणारा कोरोना आता पुन्हा साठी-सत्तरीकडे झुकू लागला आहे.. तेव्हा सावधान.. अत्यावश्यक कामाशिवाय फिरू नका..विमा असला तरी पीपीई किटपासून त्याला चिठ्ठ्या जोडून येणार आहेत.. किमान एका जणाचा खासगीतील खर्च ३० हजारांपासून ६० हजारांपर्यंत होणार आहे.. तेव्हा विचार करा.. तुमच्या हातात आहे…!
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत ८ फाटा होळ येथील ४० वर्षीय पुरूष, कारखेल येथील ४२ वर्षीय महिला, माळेगाव येथील १२ वर्षीय मुलगी, ६० वर्षीय पुरूष, ६८ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ३३ वर्षीय महिला रुग्ण आढळून आले आहेत.
यामध्येच वंजारवाडी येथील १७ वर्षीय युवक, ४६ व्रषीय पुरूष, ३५ वर्षीय महिला, पाटस रोड मेडद येथील ४५ वर्षीय पुरूष, गुनवडी येथील ५६ वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरूष, पाहुणेवाडी येथील २६ वर्षीय पुरूष, कन्हेरी येथील २७ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील २७ वर्षीय पुरूष, होळ येथील ४० वर्षीय महिला, मोरगाव रोड बारामती येथील १७ वर्षीय युवक, ४८ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ४० वर्षीय महिला, २१ वर्षीय युवती, बाबुर्डी येथील ३० वर्षीय महिला रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील २४ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय महिला, ५६ वर्षीय महिला, जगताप मळा येथील ३१ वर्षीय पुरूष, जळोची येथील ४१ वर्षीय महिला, वंजारवाडी येथील ५४ वर्षीय पुरूष, कसबा येथील ३३ वर्षीय महिला, तांदूळवाडी वेस येथील ५२ वर्षीय पुरूष, आमराई येथील ५२ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ३१ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती शहरातील २५ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ३५ वर्षीय पुरूष, अशोकनगर येथील ५५ वर्षीय पुरूष, खताळपट्टा येथील ५५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
संभाजीनगर येथील ७ वर्षीय मुलगी, कोऱ्हाळे येतील ३३ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील २४ वर्षीय पुरूष, ढेकळवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सोमेश्वरनगर येथील ५० वर्षीय पुरूष, सूर्यनगरी येथील ४४ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ६० वर्षीय महिला, पवारवाडी येथील ४७ वर्षीय महिला, पाहुणेवाडी येथील ५८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीमध्ये खासगी मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यांमध्ये पाहुणेवाडी येथील ३५ वर्षीय पुरूष, वडगाव निंबाळकर येथील ३२ वर्षीय पुरूष, बऱ्हाणपूर येथील ३६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
यामध्येच तावरेवस्ती सांगवी येथील ६३ वर्षीय पुरूष, बजरंगवाडी येथील ७५ वर्षीय पुरूष, शरदनगर तांदूळवाडी येथील ३३ वर्षीय पुरूष, नेवसे रोड भिगवण चौक येथील २४ वर्षीय पुरूष, आनंदनगर येथील २८ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
गिरीजा प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांमध्ये माळेगाव येथील ५७ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे.











