महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त आज राज्यात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. यानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अमरावती कार्यालय व कस्तुरबा खादी महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती निमित्त 25 चरख्यांवर सलग पाच तास सूत कताई करून महात्मा गांधींना अनोखी आदरांजली अर्पण केली.
कस्तुरबा सोलर एखादी महिला समितीच्या वतीने मागील पाच वर्षापासून देशातील पहिला विकेंद्रित सोलर चरखा अमरावती जिल्ह्यात राबविला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण भागातील 250 महिला सोलर चरख्यावर सूत कताई माध्यमातून आत्मनिर्भर बनल्या असून, मागील पाच वर्षापासून कापूस ते कापड उत्पादन साखळी अमरावती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
येथील औद्योगिक वसाहतीतील कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या मुख्यालयात आज हात चरखा,पेटी चरखा, अंबर चरखा, सोलर चरखा आधी विविध चरख्यांवर सलग पाच तास सूतकताई करण्यात आली.
यावेळी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर आणि रजिस्टार तुषार देशमुख यांनी भेट घेऊन सूतकताई च्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली अर्पण केली.










