व्याहाळी व काटी केंद्राची ३ री ऑनलाईन शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
इंदापूर : महान्युज लाईव्ह
व्याहाळी व काटी केंद्राची ऑनलाईन शिक्षण परिषद बुधवारी (३० सप्टेंबर) गुगल मीट ॲपवर उत्साहात पार पडली. शिक्षण परिषदेत ७२ शिक्षकांनी ऑनलाईन सहभाग घेतला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळीचे उपशिक्षक भारत ननवरे यांनी ताणतणावाचे व्यवस्थापन, ताणाचे प्रकार, तणावावर परिणाम करणारे घटक, स्वभावदोष, ताणाची कारणे, ताणाचे परिणाम, ताण व्यवस्थापण तंत्रे व उपाय याची माहिती दिली.
मिसाळ वस्ती शाळेचे उपशिक्षक सागर मिसाळ यांनी सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन, आकारिक व संकलित मूल्यमापन साधने, ऑफलाईन मूल्यमापन गरज व उद्दिष्टे, ऑफलाईन कृतीपत्रिका यावर सविस्तर माहिती दिली.
तामखडा शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार भोंग यांनी कृतीपत्रिका नमुने उदाहरणांसह स्पष्ट केले. ऑनलाईन शिक्षण परिषदेत सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सक्रिय सहभाग घेतला. अजिनाथ आदलिंग, अनिल रुपनवर, दत्तात्रय लकडे यांनी मनोगते व्यक्त केली. परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांनी केले.










