महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
हाथरसकडे जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी कलम १४४ चे कारण दाखवून राहूल गांधी व प्रियांका गांधी यांना अटक केली. यावेळी पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी केला.
हाथरसमधील दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी कॉंग्रेस नेते राहूल गांधी व प्रियांका गांधी हे हाथरसकडे निघाले होते. मात्र कलम १४४ चे कारण दाखवत उत्तर प्रदेश पोलिसांनी राहूल गांधींना अटक केली. राहूल गांधींना अटक केली असली तरी या मुलीच्या नातेवाईकांना भेटणारच असा पवित्रा प्रियांका गांधींनी कायम ठेवला. यावेळी पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. याच दरम्यान राहूल गांधींनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली.
या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. कॉंग्रेस नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत मुंबईत आंदोलन करण्याचा इरादा स्पष्ट केला.











