महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याचं घटना बीडमध्ये समोर आली. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला, त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी खचून जाऊ नका, आपण हा लढा कुठल्याही परिस्थितीत जिंकू असे भावनिक आवाहन केले आहे.
बीडमध्ये तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करीत संभाजीराजे यांनी हे आवाहन केले आहे. खासदार संभाजीराजे भोसले यांनी सोशल मीडिया मराठा तरुणांना हे आवाहन केले आहे.
संभाजीराजे म्हणाले की,विवेक रहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या परिवारासोबत आमची संवेदना आहे. घरातील कर्तृत्वाला आलेला मुलगा असा अकाली जाणे हे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.











