दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात आज 22 जण नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत.
शहरात आज प्राप्त 90 पैकी 21 जण पॅाझिटिव्ह तर 69 जण निगेटिव्ह आले आहेत.
शहरातील उपजिल्हा रुग्णालय कोवीड सेंटर मध्ये आज बुधवारी ( ता. 30 ) ९० जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये 2 ते 62 वयोगटातील 9 महिला व 12 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली. ही माहिती उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ, संग्राम डांगे यांनी दिली.
यवत कोवीड सेंटर मध्ये काल मंगळवारी (ता. 29 ) 118 जणांची तपासणी केली याचा अहवाल आज प्राप्त झाला असून 118 पैकी केवळ 60 वयोगटातील एकाजणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यवत उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी ही माहिती दिली.










