भाटनिमगाव – अवसरी भागातील 85 शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील शेतक-यांनी छेडले बोंबाबोब आदोंलन……२०१९ मधील पूरग्रस्त निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत भाटनिमगांव-अवसरी मधील 85 शेतक-यांनी एकत्र येत बोंबाबोंब आंदोलन केले.
आॅगस्ट २०१९ मधील झालेल्या अतिवृष्टीमध्ये इंदापूर तालुक्यातील भाटनिमगांव व अवसरी मधील शेतक-यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाकडून सदर पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश आले, पण अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा फटका शेकडो शेतक-यांना बसला. ११९ शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल झाले नाहीत.
यात भाटनिमगांव मधील 96 शेतकरी व अवसरी मधील 23 शेतक-यांचा समावेश आहे. महसूल खात्याकडून पंचनामा झाला, मात्र गाव कामगार तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या ताळमेळ नसल्याने तो शासन दरबारी दाखलच झाला नाही. परिणामी फक्त 34 शेतकऱ्यांना शासनाचा लाभ मिळाला, मात्र 85 शेतकरी या लाभापासून वंचित राहिले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना होती.
आज त्यांनी तलाठी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. आता याची दखल न घेतल्यास याहून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
मनोहर भोसले, शेतकरी : शासन दरबारी पंचनामा दाखल नसतानाही ११९ शेतक-यांपैकी ३४ शेतक-यांना चिरीमीरी घेऊन शासनाचा लाभ देण्यात आला. मात्र लाभापासून ८५ शेतकरी वंचित राहिले.











