बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीमध्ये काल शासकीय आरटीपीसीआरची १७८ नमुन्यांची तपासणी झाली. त्यामध्ये २२ जण कोरोनाबाधित आढळले, तर खासगी व शासकीय अॅंटिजेनच्या ८८ जणांच्या तपासणीत १३ जण कोरोनाबाधित आढळले. याखेरीज काल तालुक्यातील होळ, सांगवी व निंबूत येथे शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत झालेल्या गावाच्या सर्व्हेमध्ये १५७ जणांची तपासणी झाली. त्यामध्ये होळ गावात ६ जण, निंबूत येथे ५ तर सांगवी येथे तब्बल १६ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे काल दिवसभरात बारामती तालुक्यात ६२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. बारामती तालुक्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३२६९ वर पोचली आहे.
बारामतीतील एका प्रतिष्ठित व मान्यवर राजकीय पदाधिकाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला. बारामतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे पदाधिकारी, अनेक वर्षे सहकारी बॅंकेसह विविध सहकारी संस्थांवर त्यांनी राजकीय पदे भूषवली होती. या पदाधिकाऱ्यांचा कोरोनाने आज पहाटे बळी घेतला. बारामतीसह राज्यभरात त्यांची ओळख होती.
काल बारामती तालुक्यात तपासलेल्या कोरोना नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कटफळ येथील ८१ वर्षीय महिला, माळेगाव येथील ३२ वर्षीय महिला, कांबळेश्वर येथील २५ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ४२ वर्षीय पुरूष, मानाप्पावाडी येथील ७५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
वाकी येथील ३० वर्षीय पुरूष,काटेवाडी येथील ३६ वर्षीय पुरूष, गुनवडी येथील ४७ वर्षीय पुरूष, चोपडज येथील ६५ वर्षीय महिला, माळेगाव येथील २८ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील २८ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, सायली हिल येथील ४४ वर्षीय महिला, जळगाव सुपे येथील २८ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश
बारामतीत तपासलेल्या नमुन्यांमध्ये इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील २५ वर्षीय महिला, सणसर येथील ६७ वर्षीय पुरूष हे दोघे कोरोनाबाधित आढळले आहेत.










