इंदापूर : महान्यूज लाईव्ह
जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून भोडणी येथे जिल्हा परिषद फंडातून बांधलेल्या सिद्धनाथ मंदिर सभामंडपाचे जेष्ठ नागरिकांच्या हस्ते आज नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.
अंकिता पाटील म्हणाल्या की,’ गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक व महिला यांच्या सूचना विचारात घेऊन आपण विकासकामे करत आहोत. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच अनिल चव्हाण उपस्थित होते. सभामंडपाची मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.











