दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील मोटेवाडा परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी कुलप तोडून घरातील दोन लाख बारा हजार किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत आप्पा बाबू बरकडे (वय 35 रा. पाटस, मोटेवाडा ता दौंड) यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवार (दि.२५) व शनिवारी( दि. २६ ) मध्यरात्रीच्या दरम्यान ही घटना घडली.
आप्पा बरकडे यांच्या घरी कोण नसल्याने अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत घराचे कडी कोंयडा हत्यारांच्या साह्याने तोडून घरात अनधिकृतपणे प्रवेश करून पोत्यात ठेवलेल्या दोन लहान डब्यामधील 2 लाख 12 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करून चोरून नेले.
दरम्यान पोलिसांनी याबाबत अज्ञात चोरट्याविरूद्ध यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच हवेली च्या उपविभागीय पोलीस अधिकारी भोरे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी भेट दिली. पुढील तपास पाटसचे फौजदार रामभाऊ घाडगे हे करीत आहे.











