दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड मधील बोरावकेनगर येथील कचऱ्याच्या ढिगार्यात आज अचानक अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष सीलबंद बरणीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बरणीवर सन 2020 हा आकडा असल्याने कचऱ्याच्या ढिगार्यात ही बरणी आली कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे.
दौंडमधील बोरावकेनगर परिसरात कचऱ्याच्या ढिगार्यात अर्भक असलेली ही बरणी सापडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी 112 क्रमांकाला डायल करून पोलिसांना माहिती दिली. त्यावरून दौंडचे पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा केला.
त्यानंतर डॉक्टरांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी पोचले आणि त्यांनी ही बरणी ताब्यात घेतली. दरम्यान प्रथमदर्शनी हे अर्भक आणि मानवी अवशेष असलेली बरणी प्रयोगशाळेतील असल्याचे दिसत आहे. मात्र ही बरणी या ठिकाणी कशी आली की, गर्भपातासारखा एखादा प्रकार झाला आहे की काय? असा देखील प्रश्न उपस्थित झाल्याने पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.











