शिरूर : महान्यूज लाईव्ह
घटना हे शिरूर तालुक्यातील कंटेनर आणि स्विफ्ट गाडीची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले. शिरूर तालुक्यातील न्हावरे तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील सरकेवस्ती या गावानजिक रविवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली.
या घटनेत बाप लेकीचा जागेच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. तर एका जवळच्या नातेवाईकाचा देखील मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास गायकवाड हे त्यांची मारुती स्विफ्ट गाडी घेऊन तळेगाव बाजू कडून न्हावरे बाजूकडे येत होते. त्याचवेळी कंटेनर ने समोर येऊन धडक दिली.
या घटनेत स्विफ्ट गाडीचे चालक कैलास कृष्णाजी गायकवाड, त्यांची मुलगी गौरी कैलास गायकवाड व गणेश महादेव निर्लेकर या तिघा जणांचा मृत्यू झाला. हे तिघेही न्हावरे गावचे रहिवासी आहेत. याच घटनेत गाडीतील कैलास गायकवाड यांच्या पत्नी दुर्गा या गंभीर जखमी झाल्या आहेत.











