महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून बळीराजाला दिलासा द्यावा असेही बंब यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान गेल्या काही वर्षभरापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी अतिवृष्टी, तर कधी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेती कशी करावी हा प्रश्न समोर पडला आहे.










