बारामती : महान्यूज लाईव्ह
आज सकाळी सहा वाजता बारामती नगर परिषदेच्या समोर भरधाव टाटा कंपनीचा बसणे रस्त्याने चालत जाणाऱ्या 82 वर्षी जेष्ठ नागरिकाला निर्दयीपणे ठोस मारली व त्याच्या डोक्यावरून बसचे चाक गेले. या घटनेने शहरात संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान शहर पोलिसांनी यातील आरोपीला शोधले.
याप्रकरणी पोलिसांनी खंडोबा नगर येथील सुनील पांडुरंग शेडगे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेत मोतीलाल उत्तमचंद दोशी त्या 82 वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. या घटने प्रकरणी सतीश कांतीलाल दोशी यांनी फिर्याद दिली.
या घटने संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज सकाळी सव्वा सहा ते साडेसहा दरम्यान ही घटना बारामती नगर परिषदेसमोर घडली. मोतीलाल उत्तमचंद दोशी हे नेहमीप्रमाणे घरातून पायी चालत बारामती नगरपरिषद समोरुन चालत जात होते. पाठीमागून येणा-या टाटा कंपनीची बस (क्र MH-01-L-7309) चा चालक सुनिल पांडुरंग शेंडगे याने त्याच्या ताब्यातील सदरची बस भरधाव वेगात वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करून बेदारकपणे हयगयीने चालवत नेली. या बसने मोतीलाल उत्तमचंद दोशी यांना धडक दिली यात बसचे चाक दोशी यांचे डोक्यावरुन जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.











