दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : कवठे (ता. वाई) येथील अमोल अशोक खरात याला लैंगिक अत्याचार केल्याच्या खटल्यात वाईच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षाची शिक्षा सुनावली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी, १९ मार्च २०१३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता कवठे गावच्या हद्दीत अमोल अशोक खरात याने पिडीतेस उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याबाबत भुईज पोलीस ठाण्यात पोस्को कायदा कलम ४८ – १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्यातील आरोपी अमोल अशोक खरात (वय – २७ वर्ष रा. कवठे ता. वाई जि. सातारा) याच्याविरुध्द तत्कालीन तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक एन. व्ही. पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्या न्यायालयात चालली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील डी. एस. पाटील यांनी कामकाज पाहिले आहे. सरकारी पक्षातर्फे
एकूण ७ साक्षीदार तपासले.
परिस्थीतीजन्य पुरावा व साक्षीदार यांचे साक्षीवरुन न्यायालयाने आरोपी अमोल अशोक खरात याला दोषी ठरवून त्यास सदर गुन्हयात ७ वर्ष शिक्षा, ५०० रुपये दंड, दंड न भरलेस १५ दिवस साधी कैद हि शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षास भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक रमेश गर्जे, तत्कालीन तपासी अंमलदार एन.व्ही. पवार, पैरवी अंमलदार घोरपडे, आगम यांनी सहकार्य केले.











