नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
हळूहळू तापमानाचा पारा वाढू लागला आहे आणि आता दुकानातील, घरातील, शोरूम मधील एसी वेगाने वारा वाहू लागले आहेत. मात्र पावसाळ्यापासून ते कालपरवापर्यंत एसी बंद ठेवल्यानंतर लगेच चालू करायची घाई असलेल्यांसाठी दिल्लीत घडलेली ही बातमी महत्त्वाची!
दिल्लीच्या कृष्णा नगर भागात एका एसीच्या दुकानातच ही घटना घडली. या घटनेत मोहनलाल नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. बरेच दिवस एसी चालू न केल्यामुळे अचानक एसी चालू केल्याचा परिणाम म्हणून कॉम्प्रेसर, शॉर्टसर्किट, हायव्होल्टेज या विविध कारणांमुळे एसीचा स्फोट होऊ शकतो. हे यातून दिसून आले.
दरम्यान या घटनेनंतर दिल्लीतही अनेक शोरूम दुकानदारांनी आपापल्या एसी कारागीरांकडून दुरुस्त करून घेतल्या आहेत. पावसाळ्यापासून अनेक ठिकाणी एसी बंद असतो अशावेळी देखभाली अभावी त्याचा कॉम्प्रेसर प्रमाणापेक्षा अचानक गरम होऊ शकतो आणि स्फोट होऊ शकतो, एखाद्या वातानुकूलित यंत्रातील कंडेन्सर पर्यंत जाणारा गॅसचा पाईप लिकेज होऊ शकतो. हे लिकेज वेळेत काढले नाही तर हा धोका बसू शकतो. एसी चा कोणताही तांत्रिक बिघाड रोखायचा असेल, तर एअर फिल्टर, विजेची उपलब्धता, गॅस गळती, स्टॅबिलायझर या सर्वावर नीट लक्ष द्या.











