• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साहेब, आता मी माझ्या बायकोला जीवे मारतोय… असा फोन तो 112 वारंवार करायचा! पोलिसांची धावपळ व्हायची! कारखेलच्या भिमावर अखेर पोलिसांनी केला गुन्हा दाखल! 

tdadmin by tdadmin
March 10, 2025
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
साहेब, आता मी माझ्या बायकोला जीवे मारतोय… असा फोन तो 112 वारंवार करायचा! पोलिसांची धावपळ व्हायची! कारखेलच्या भिमावर अखेर पोलिसांनी केला गुन्हा दाखल! 

सचिन पवार : महान्यूज लाईव्ह

सरकारी योजना लोकांच्या मदतीसाठी असतात परंतु काही वेळा ती योजना काम करते की नाही याच्यासाठी काहीजण उगीचच तपासून बघतात, तर काहीजण त्रास देण्यासाठी..! जसं की 108, जसं की 112 डायल योजना! अत्यंत अडचणीच्या वेळेस पोलीस उपलब्ध व्हावेत, रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी हे नंबर दिलेले आहेत. पण काही जण कधी कधी त्याचा गैरवापर करतात आणि विनाकारण यंत्रणेची धावपळ करतात. सुपे पोलिसांनी मात्र कारखेलच्या एकाला धडा शिकवला आहे.

कारखेल येथून एक जण सातत्याने पोलिसांना 112 वरून डायल करून मी बायकोला जीवे मारतो आहे अशा प्रकारचा इशारा देत शिवीगाळ करताना ऐकायला मिळायचा. अर्थात 112 यंत्रणेवरून तातडीने त्याची लोकेशन शोधून पोलिसांना माहिती दिली जायची. असे काही वेळा घडले. अखेर सुप्याचे सहाय्यक निरीक्षक मनोजकुमार नवसारे यांनी कारखेलच्या पोलीस पाटलांना आणि पोलिसांना सूचना केली. 

त्यावरून सुप्याचे पोलीस कर्मचारी सागर वाघमोडे, कारखेलचे पोलीस पाटील सचिन जगताप आणि होमगार्ड सुरज चांदगुडे यांनी संबंधित व्यक्तीच्या घरी भेट दिली. तेव्हा त्याचे नाव भीमा दशरथ भापकर असे आढळून आले. भीमा भापकर याने हा फोन खोटा केल्याची आढळून आले. 

त्याच्या पत्नीकडे चौकशी केल्यानंतर तिने आपला पती हा विनाकारण 112 आणि 108 डायल नंबर वर खोटे फोन करतो. आजपर्यंत मला कधीही मारहाण झालेले नाही अथवा जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला नाही मात्र तो वारंवार खोटे कॉल करत असतो अशी माहिती दिली. 

मग पोलिसांनी भीमा भापकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्याने देखील काहीच घडले नव्हते. मी खोटा कॉल केला होता असे सांगितले. सातत्याने यंत्रणेचा गैरवापर व यंत्रणेची धावपळ करत असल्याने अखेर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१२ (a) अन्वये भीमा भापकर याच्यावर गुन्हा दाखल केला. 

Next Post
आजपासून एसटी 15 टक्क्यांनी महागली..! 15 आणि 1500?

महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार व गर्भपात! बंटी पाटलाच्या पुतण्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group