बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत ही घटना घडली असून, फिर्यादीचा नातू व आरोपीची मुलगी एका अंथरूणात आढळल्याने मुलाला मोबाईलचे चार्जरने मारहाण केली, गुप्तेंद्रीयावर तिखट लावले अशी फिर्याद बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर पोलिसांनी ॲट्रॉसिटी व BNS-118(1), बाल न्याय कायदा (जे. जे. अॅक्ट 72 (1)), मुलांची काळजी आणि सं अधि क 2015, अँट्रो सिटी कलम 3(1) (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील फिर्यादी महिलेने फिर्याद दिली असून त्यावरून डोर्लेवाडीतील आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ची घटना घडली.
27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी फिर्यादी ही डोर्लेवाडी येथे गेली असता, फिर्यादीचा नातू मोठमोठ्याने रडू लागला. फिर्यादी महिलेने त्याच्याशी संवाद साधला असता, त्या नातूने तो त्याच दिवशी दुपारच्या वेळी आरोपीच्या मुलीसोबत एका अंथरुणात झोपलेला आढळला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने पाठीवर, पोटावर व डाव्या हाताच्या दंडावर मोबाईलच्या चार्जरच्या वायरने मारहाण केली. तसेच अवघड जागेवर लाल तिखट लावले व तिखट खाण्यास दिले अशी माहिती दिली.
त्यावरून फिर्यादी महिलेने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली बारामती शहर पोलीसांना फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी वरील गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.











