राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : पाटस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुरू असलेल्या विकासकामात अडथळे निर्माण करून अडवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पाटस पोलीसांकडे केली आहे.
पाटस हद्दीत चालु असलेल्या विकासकामास राजेश लाड हा व्यक्ती अडवणूक करतो. गावातील प्रत्येक कामात खंडणीची मागणी करतात. त्यामुळे गेली ४ ते ५ वर्षापासून गावात विकासकामे होत नाहीत. तसेच ग्रामपंचायतीस विनाकारण माहिती अधिकार अर्ज देऊन नाहक त्रास जाणून बुजून देतात. तसेच ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच समाजकंटक म्हणून ठराव करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख म्हणाले की, संबंधित व्यक्तींवर सरपंच तृप्ती भंडलकर यांच्या पतीच्या अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











