बारामती : महान्यूज लाईव्ह
आज बारामती शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. ज्यामध्ये तिघा जणांनी गाडी आडवी लावून शिवीगाळ करत 19 वर्षाच्या युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याला जखमी केले.
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात विनोद गणेश जाधव या 19 वर्षीय मुलाने तक्रार दिली, त्यावरून पोलिसांनी आनंद शाम सूर्यवंशी, विक्रांत गोरख गायकवाड व रुद्र नवनाथ सूर्यवंशी (सर्व रा. नेवसे रोड, चिमण शहामळा बारामती) या तिघा विरोधात भारतीय न्याय संहिता 118(1), 351 (2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता सुमारास भिगवण चौकात घडली. फिर्यादी हा भिगवण चौकात असताना विक्रांत गायकवाड व रुद्र सूर्यवंशी हे दोघे तिथे आले व त्यांनी गाडी आडवी लावून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर आनंद सूर्यवंशी याने शेजारी पडलेला दगड उचलून तो डोक्यात घातला व हाताच्या कड्याने डोळ्याच्या वरच्या बाजूला जखम केली. या घटनेचा पुढील तपास बारामती पोलीस करत आहेत.











