डॉ. संदेश शहा, इंदापूर
इंदापूर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक श्रीनिवास ऊर्फ दादासाहेब हनुमंत देशपांडे ( वय ८२ वर्ष ) यांचे दुःखद निधन झाले. ते श्री क्षेत्र नीरा नरसिंहपुर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे विश्वस्त, शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष होते.
ते इंदापूर जनता सहकारी बँकेचे कायदेशीर सल्लागार होते. तसेच इंदापूर वकील संघटनेचे ते संस्थापक तसेच अखिल मंडई संचलित श्रीमंत शिवराज गणेशोत्सव मंडळाचे ते मार्गदर्शक होते. त्याच्या मागे मुलगा, सुन मुली, जावई, नातू असा परिवार आहे. त्यांच्यावर नवीन तहसिल कार्यालयाशेजारील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर वकील संघटनेचे संस्थापक विधीज्ञ प्रकाश वाघमोडे, नागरी संघर्ष समितीचे कृष्णा ताटे, रा. स्व संघाचे तालुका कार्यवाह नाना घळके, लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे धनंजय दुनाखे यांनी श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त केले. रा. स्व संघाचे बारामती जिल्हा संपर्क प्रमुख सतिश देशपांडे, शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुंकुंद शहा, तालुका स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह प्रशांत भिसे, ब्राम्हण सेवा संघाचे प्रसाद जोशी, पत्रकार सुरेश जकाते उपस्थित होते.











