छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेला सोलापूरचा छिचोर अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या वक्तव्यावरून सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. राहुल सोलापूरकर याने हे वाक्य जाणीवपूर्वक वापरले असून, अजूनही तो माध्यमासमोर किंवा माफी मागण्यासाठी येत नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्रातील लोक पेटतात का? संतप्त होतात का? याची एक लिटमस चाचणी सध्या घेतली जात असल्याचाही सूर उमटत आहे.
दरम्यान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संत भूमिका मांडत राहुल सोलापूरकर कोण आहे? अशांना गोळ्या घालायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची देखील भेट घेणार असून अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. या सगळ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे. अशी विकृती वाढली तर देशाच्या अखंडतेत धोका निर्माण होईल. मी याचा कठोर शब्दात निषेध करतो. अशांना गोळ्या घालून मारले पाहिजे असे मला वाटते असे उदयनराजे म्हणाले.
दरम्यान राहुल सोलापूरकर याने माफी मागितली असून त्या प्रकरणावर सुषमा अंधारे आणि अमोल मिटकरी यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त करताना दारू पिऊन व्यक्त केली अशी टीका केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
अमोल मिटकरी यांनी सांगितले की, राहुल सोलापूरकरने थातूरमातूर दिलगिरी व्यक्त केली असली तरी हिरकणी बद्दल केलेलं वक्तव्य, मोईनखान, पेटारे नसल्याचे केलेली बतावणी, आग्रा सुटकेत हुंडी पाठवल्याचे पुरावे सादर केलेले नाहीत. त्याने दिलगिरी सुद्धा नशा करून मागितली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
दुसरीकडे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी कवट्या महाकाळ जिथे दिसेल तिथे हाणा असे आवाहन केले आहे. सुषमा अंधारे यांनी अगोदर ठरवून खोडसाळपणा करणारे आणि नंतर दिलगिरी व्यक्त करणारे अशा खोडसाळ प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आयपीसी 295 अंतर्गत राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. शिवाय सोलापूरकर हा प्राच्यविद्या भांडारकर संस्थेचा पदाधिकारी आहे. या संस्थेला मिळणाऱ्या शासकीय मदत निधी सुद्धा चौकशी व्हायला हवी, कारण अनेक वर्षांपूर्वी जेम्स लेन प्रकरणात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संबंधाने बदनामीकारक मजकूर छापण्यास मदत करणारे भांडारकर ट्रस्टशी संबंधित होते असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.











