महान्यूज : आजची गझल
मी कधीही बोललो नाही कुणाला
आग आहे लागली माझ्या मनाला
फूल मजला वाटले होते खरे जे
शेवटी दाहक निखारा तो निघाला
काळजी नव्हतीच मजला हारण्याची
मी कसे समजावुनी सांगू जगाला
जे नको ते सांडुनी द्या ना तुम्हीपण
चालली त्याचीच चर्चा ही कशाला
नाव माझी सोडली आहे प्रवाही
यायचे तर येऊ दे त्या वादळाला
मी उभा होतोच त्याच्या स्वागताला
दु:ख हे आले जरीही आसऱ्याला
गझलकार- प्रमोद खराडे
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











खूप सुंदर