अहिल्यानगर : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला यंदा वादाचे गालबोट लागले आणि या बाजारच्या पार्श्वभूमीवरच मैदान सोडलेल्या महेंद्र गायकवाड मुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पृथ्वीराज मोहोळ ला यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब बहाल केला.
एकीकडे शिवराज राक्षे आणि दुसरीकडे महेंद्र गायकवाड या दोघांमुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला यंदा वादाचे गालबोट लागले. अर्थात अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर भारी पडला आणि त्याने सामना जिंकला. पंचांनी दिलेल्या निकालावर आक्षेप घेत महेंद्र गायकवाड ने मैदान सोडले आणि महाराष्ट्र कुस्तीगीर स्पर्धेने पृथ्वीराज मोहोळ ला महाराष्ट्र केसरी किताब बहाल केला.
पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांची अंतिम लढत झाली. तब्बल पाच मिनिटे ही कुस्ती सुरू होती. शेवटच्या डावात महेंद्र गायकवाड वर पृथ्वीराज मोहोळ ने बाजी मारली. परंतु गायकवाडने आक्षेप घेतला आणि त्यांनी मैदान सोडले. यानंतर महाराष्ट्र कुस्तीतील स्पर्धेने पृथ्वीराज मोहोळ याला यंदाचा महाराष्ट्र केसरी घोषित केले आणि मैदानात एकच जल्लोष झाला.
मोहोळ याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि महिंद्रा कंपनीची थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते











