संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार : शेगाव – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर लोणार शहराजवळील हॉटेल हर्षाजवळ हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गौढाळा गावातील भाविकांच्या बोलेरो पिकअप गाडीला अपघात झाला. यात अनेकजण गंभीर जखमी झाले.
लोणार तालुक्यातील किनगाव जटटू येथील दर्ग्यावर नवस फेडण्यासाठी सदर भाविक जात होते. बोलोरो पिकअप मालवाहू गाडी (क्रमांक एम. एच. ४८. ए. वाय. ६०११ ने) जात असतांना गाडीचा अचानक जॉईट तुटल्याने भरधाव पिकअप गाडी पलटी होऊन गाडीतील १६ भाविक जखमी झाले. तसेच ३ भाविकांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
यामध्ये संभाजी दशरथ कांबळे (वय ४० वर्ष), लक्ष्मण निधान भिसे (वय ५२ वर्ष), भीमराव सदाशिव घारे (वय ६० वर्ष), अनुसया साहेबराव पाईकराव (वय ६० वर्ष), शंतनू दिपक उबाळे (वय १४ वर्ष), संदीप शांताराम उबाळे (वय ३९ वर्ष), प्रणाली संदीप उबाळे (वय १८ वर्ष), सुनिल सपन पहेबहादूर (वय ३८ वर्ष), राजकुमार जीजेबा उबाळे (वय ५० वर्ष), भीमराव सदाशिव लाटे (वय ४५ वर्ष), विनोद बाबुराव उबाळे (वय ३५ वर्ष), केशव कुंडलिक गायकवाड (वय ३५ वर्ष),
भारती भास्कर कांबळे (वय ५० वर्ष), दिपक तुकाराम उबाळे (वय ४० वर्ष), सोहम दिपक उबाळे (वय १३ वर्ष), प्रणव संदीप उबाळे (वय १७ वर्ष) या भाविकांचा समावेश आहे.
हे सर्व हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले, बीट जमादार संतोष चव्हाण, अनिल शिंदे, गणेश निकस, वाहतूक शाखेचे पंढरीनाथ गीते, मनोजकुमार शेजूळ, राहुल कायंदे यांनी धाव घेत मदत केली.











