बीड : महान्यूज लाईव्ह
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस अधिकाधिक आक्रमक झाले आहेत दरम्यान सुरेश धस हे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आक्रमक झाल्यानंतर वंजारी समाजाचे काही युवक सोशल मीडियावर मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पेटवताना दिसत आहे मात्र आता त्यांनाही एक उत्तर या निमित्ताने द्यावे लागेल ते नाव आहे महादेव मुंडे!
पंधरा महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. 22 ऑक्टोबर 2023 रोजी ही घटना घडली होती. या घटनेतील आरोपी दोन दिवसात पकडून असे तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना आश्वासन दिले होते मात्र अजून पर्यंत हे आरोपी सापडले नाहीत आता ज्ञानेश्वरी मुंडे आणि सुरेश धस या दोघांनीही या संदर्भात महत्त्वाचे भाष्य केले आहे.
आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सांगितले की, महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी हे वाल्मीक कराड यांच्या मुलाच्या अवतीभोवती फिरतात आणि त्यामुळेच त्यांना पकडले जात नाही. तर दुसरीकडे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपासासाठी एसआयटी नेमली, त्याप्रमाणेच माझ्या पतीच्याही खून प्रकरणात एसआयटी नेमावी अशी मागणी केली आहे. आपल्यालाही न्याय हवा असून गेली 15 महिने आम्हाला न्याय मिळालेला नाही असे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटले आहे.
सुरेश धस यांनी केलेल्या या नव्या आरोपामुळे आता वाल्मीक कराड यांच्या मुलाच्या भोवती देखील चौकशीचे फासे गुंतले जात आहेत असेच दिसत आहे. दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर वाल्मीक कराड ज्या गाडीतून पळाला त्याचीही सीसीटीव्ही फुटेज नव्याने मिळाले आहे.











