पुणे : महान्यूज लाईव्ह
9 जानेवारी 2025 रोजी पुणे स्टेशन समोरील होम लँड लॉज मध्ये बालेवाडीतील अंकुश डांगे या 45 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी अंकुश डांगे यांच्या पत्नीने बंड गार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्याचा तपास केला आणि माढा तालुक्यातील बेचाळीस वर्षीय महिला वकील या प्रकरणात असल्याची उघडकीस आले.
9 जानेवारी रोजी अंकुश डांगे यांनी आत्महत्या केली, तेव्हा ही महिला वकील तिथे हजर होती आणि या महिला वकीलाचे पती न्यायाधीश असून त्यांना या अनैतिक प्रेमसंबंधाबद्दल माहिती होती असे पोलीस तपासात उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला वकिलाची व अंकुश डांगे यांची व्यवसायातून ओळख झाली. त्यातून प्रेमसंबंध तयार झाले व ऑक्टोबर 2024 पासून पत्नी व मुलीला सोडून माझ्याबरोबर राहा, अन्यथा आत्महत्या कर असा तगादा या महिला वकिलाने लावला होता.
दरम्यान डांगे यांचा मुलगा आणि महिला व किल्ल्याची मुलगी यांचे लग्न लावून देण्याची मागणी करत डांगे यांनी त्यांच्या मंगल कार्यालयाचे सुशोभीकरणासाठी व बारच्या सुशोभीकरणासाठी घेतलेले 30 लाख रुपये परत कर, अन्यथा सुस येथे असलेल्या फ्लॅट माझ्या नावावर कर असा तगादा या महिला वकिलांनी लावला होता, त्यामुळे अंकुश डांगे यांनी या महिला वकिलासमोरच आत्महत्या केली अशी फिर्याद डांगे यांच्या पत्नीने दिली.











