शिरूर : महान्यूज लाईव्ह
घटना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर नजिकची. या घटनेने पुणे जिल्ह्यातील अनेकांच्या डोळ्याला पाणी आले. मुलांना शाळेमध्ये घेऊन निघालेल्या वडिलांच्या दुचाकीला ट्रकने चिरडल्याने तिघांचा मृत्यू झाला.
ही घटना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर चाकण महामार्गावर सहा जानेवारी रोजी घडली. या घटनेत वडील गणेश खेडकर यांच्यासह त्यांची तन्मय आणि शिवम अशी दोन मुले ही मृत्युमुखी पडली. तन्मय हात येत तिसरीमध्ये शिकत होता तर शिवम दुसरी मध्ये शिकत होता. या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गणेश खेडकर निघाले होते.
गणेश खेडकर त्याच्या दुचाकीवरून निघाले असताना पशुखाद्य वाहून नेणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर या तिघांनाही ट्रकने चिरडले. धडक एवढी जोरात होती की, ट्रकखाली सापडून तिघेही जागीच ठार झाले. ही घटना समजताच परिसरातील नागरिक संतप्त झाले. दरम्यान पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोचले. त्यांनी चालकाला ताब्यात घेतले.











