महाड : महान्यूज लाईव्ह
महाडच्या दिशेने मुंबई -गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्टेशन जवळ स्कॉर्पिओ गाडीतील डिझेल संपल्याने गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सहा जण थांबले होते. मागून टोइंग व्हॅन एवढ्या गतीने आली की, तिने स्कॉर्पिओला तर उडवलेच, शिवाय स्कॉर्पिओ जवळ उभी असलेल्या सर्वांनाच जोरदार धडक दिली.
या घटनेत महाड येथील सूर्यकांत मोरे, साहिल शेलार, समिप मिंडे व प्रसाद नातेकर हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले, तर सुरेश नलावडे व शुभम माटल हे दोघेजण जखमी झाले. ही धडक एवढी जबरदस्त होती की या अपघातानंतर स्कॉर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला तब्बल दीडशे फूट लांब ही गाडी फेकली गेली.
महाड वरून मुंबईला निघालेले हे सहा जण वीर रेल्वे स्थानकाजवळ त्यांच्या स्कॉर्पिओ जीप मधील डिझेल संपल्याने गाडी उभी करून थांबले होते. डिझेल आणण्यासाठी एक जण गेला होता. तोपर्यंत ही घटना घडली.











