पुणे : महान्यूज लाईव्ह
कल्याण नगर महामार्गावर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जुन्नर तालुक्याच्या मढ गावच्या हद्दीत चारचाकी व दुचाकीच्या धडकेत एका मुलीसह पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या घडली.
कल्याण अहिल्यानगर महामार्गावर जुन्नर तालुक्याच्या मढ गावच्या हद्दीत सितेवाडी फाटा नजीक ही घटना घडली. या घटनेमध्ये जुन्नर तालुक्यातील पिंपरी मेंढर येथील नवलेवाडी गावचे निलेश कुटे, त्यांच्या पत्नी जयश्री कुटे, व मुलगी श्रावणी कुटे हे तिघेजण जागीच मरण पावले. कुठे दाम्पत्य ओतूर कडून कल्याणच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते.
निलेश कुटे हे त्याच्या दुचाकीवरून कल्याणच्या बाजूकडे जात असताना कल्याण बाजूकडून ओतूरच्या दिशेने (एमएच १६ ए टी ०७१५ ही) चारचाकी अचानक समोर आली. सीतेवाडी फाट्यानाजीक असलेल्या देवेंद्र हॉटेलजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, यात तिघेही जागीच मयत झाले.











