महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
प्रसिद्ध पार्श्र्वगायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांच निधन वयाच्या 74 व्या वर्षी झाले. एका प्रतिभावंत कलाकाराची कोरोना विरोधी झुंज अखेर अपयशी ठरली.
दोन आठवड्यांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खलावली. त्यामुळे त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत आज मालवली.
बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे 5ऑगस्ट रोजी त्यांना उपचारासाठी एमजीएम हेल्थकेअर या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली.
याविषयी त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खलावली. म्हणुन त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. दुर्दैवाने त्यांच आज निधन झाले. १९६६ पासून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास आज संपला. ४० हजारांहून अधिक गीते त्यांनी गायली.










