छत्रपती संभाजीनगर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती संभाजीनगर मधील या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरवून टाकला आहे. वयात आलेली मुलं कशाचाही विचार न करता शिल्लक कारणावरून टोकाचा निर्णय घेतात आणि त्याचा परिणाम खूप भोगाव लागतो. छत्रपती संभाजी नगर मधील एका होस्टेलमध्ये राहून नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय मुलीच्या बाबतीत भयंकर घटना घडली आहे.
अभ्यासाच्या ताणतणावातून 30 नोव्हेंबर रोजी या मुलीचा आई वडिलांशी वाद झाला. रागाच्या भरात ती मुलगी त्या होस्टेलमधून निघून गेली. जाताना तिने घरी जात असल्याचे रजिस्टर वर नोंदवले. आता पुन्हा आई-वडिलांना भेटायचेच नाही असे ठरवून खिशात फक्त दोनशे रुपये घेऊन ती निघाली. मिळेल त्या वाहनाने प्रवास करत ती छत्रपती संभाजीनगर पासून पुण्यापर्यंत पोहोचली. या दरम्यानच्या काळात नाशिक, यवतमाळ, परभणी आणि पुणे जिल्ह्यात तिला मदत करण्याच्या बहाण्याने नराधमांनी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला.
पोलिसांनी या प्रकरणात पुण्यातील समाधान शिंदे, नाशिक मधील निखिल बगाडे, परभणीचा प्रदीप शिंदे आणि पुसद, यवतमाळचा रोहित ढाकरे या चार जणांना अटक केली. ही विद्यार्थिनी परभणीला गेली होती. तेव्हा तिला प्रदीप शिंदे भेटला त्याने राहण्यासाठी जागा देण्याच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यानेच तिला पुसदला नेऊन ओळखीच्या रोहित ढाकरे यांच्याकडे सोडले.
ढाकरे याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ती नाशिकला पोहोचली, तेव्हा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिल बोर्ड याने जेवण व राहण्यासाठी पैसे देण्याच्या पाहण्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ती मुलगी पुण्याला आली. इथे टॅक्सी चालक असलेल्या समाधान शिंदे यांनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला.
या दरम्यानच्या काळात पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे या पिडीत मुलीचा तपास सुरू केला, तेव्हा ती पुण्यात असल्याची माहिती मिळाली आणि पोलीस तिच्यापर्यंत पोचले. तिने पोलिसांना सगळ्या प्रकार सांगितला. त्यावरून पोलिसांनी वरील गुन्हा दाखल केला.











