पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्याजवळच्या चाकणची घटना. मित्राला विचारलं की, खूप दिवस मैत्री झाली, आता लग्न कधी करणार? मित्राला फार राग आला. मित्राने थेट लग्नाला नकार देत मैत्रिणीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आणि ती त्यात जखमी झाली. मग रीतसर पोलीस केस झाली आणि आता मित्राचा शोध पोलीस घेत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक हेमंत लेडघर वय 24 राहणार राणूबाई मळा चाकण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास चाकणच्या मार्केट यार्ड चौकातील रुद्राक्ष हॉटेल समोर ही घटना घडली.
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अभिषेक हा फिर्यादीचा मित्र आहे. तो बुधवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास हॉटेल समोर उभा असताना फिर्यादीने माझ्याशी लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला. त्यावर मी तुझ्याशी लग्न करत नाही असे म्हणत त्याने लोखंडी हॅमरने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली. तसेच तिच्या दुचाकीचेही नुकसान केले. त्यावरून फिर्यादीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.











