पुणे : महान्यूज लाईव्ह
यावर्षी पाऊसही अधिक पडला आणि थंडीचा प्रभावही सर्वाधिक जाणवतो आहे. यंदा तापमान 10° चाही खाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये गुरुवारी मोजले गेलेले तापमान चक्क 7.5 ते 8.9 पर्यंत मोजले गेले आहे. बारामती मध्ये गुरुवारी 10.1 अंश सेल्सिअस एवढी थंडी होती तर दौंड मध्ये तीच थंडी 9.3 अंश सेल्सिअस पर्यंत. इंदापूर मध्ये मात्र हेच वातावरण बारा अंशापर्यंत वाढलेले होते. सोलापूर कडे जशी जशी जाईल तसतसे तापमान थोडेसे अधिक असल्याचे दिसते. मात्र पुण्यापर्यंत तापमान अधिकच उणे अंशापर्यंत जाताना दिसते.
ऊन जरा जास्तच आहे असं म्हणणाऱ्यांना यावर्षी मात्र थंडी दरवर्षीपेक्षा अधिक आहे याची एव्हाना जाणीव झाली आहे. गेल्या दोन ते चार दिवसापासून दिवसा देखील घरामधील वातावरण थंड राहत असून उन्हात पडल्यानंतर देखील थंडीचा गारवा अनुभवायला येत आहे. संध्याकाळी चार साडेचार वाजल्यापासूनच थंडीने हुडहुडी भरत आहे.
गुरुवारी पुणे शहरात सर्वात कमी निशांत तापमान एनडीए परिसरात नोंदवले गेले तिथे 7.5 अंश सेल्सिअस एवढे तापमानाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये दौंड मध्ये 9.30 तर नारायणगाव आणि बारामती मध्ये 10. 1° पर्यंत ही नोंद झाली आहे. अर्थात ज्या भागात सर्वाधिक पाऊस पडला त्या खेड जुन्नर भागात हेच तापमान 10° पासून 11.2 अंशापर्यंत नोंदले गेले आहे.











