अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
पुणे पर्वती भाग या ठिकाणी विविध सर्व हिंदुत्व वादी संघटना व सकल हिंदू समाजाने बांगला देश मधील हिंदू समाजा वरती होणाऱ्या अत्याचार विरोधात मोर्चा घेऊन बांगलादेशचा झेंडा पाया खाली तुडवण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात लक्ष्मी नारायण चौक, कर्मवीर भाऊ राव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लक्ष्मीनारायण चौका ते स्वारगेट चौक अशी करण्यात आली. यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला व स्वारगेट पोलिस ठाण्यात फौजदार युवराज नाद्रे यांना निवेदन देण्यात आले.
मानवाधिकाराच्या रक्षणार्थ महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात न्याय यात्रा व निवेदन सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या न्याय यात्रेचा उद्देश होता की, बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडणे, त्यांच्या मौलिक अधिकारांचे संरक्षण व्हावे यासाठी दबाव निर्माण करणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे हे या न्याय यात्रेचे मुख्य उद्दिष्ट होते.
बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयांमध्ये काळ्या फिती बांधून आपल्या निषेधाची नोंद केली. तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनामध्ये पुढील मुख्य मागण्या होत्या की, बांगलादेशातील हिंदूंच्या जीवितहानी, संपत्ती व धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलणे. बांगलादेश सरकारला अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करण्यास भाग पाडण्यासाठी जागतिक दबाव निर्माण करणे. भारत सरकारने या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पटलावर नेऊन प्रभावी उपाययोजना सुरू कराव्यात. अत्याचारग्रस्त हिंदूंचे संरक्षण व पुनर्वसन करण्यासाठी धोरण आखावे अशा मागण्या करण्यात आल्या.











