युवराज जाधव : महान्यूज लाईव्ह
घटना सांगली जिल्ह्यातील आहे सांगली शहरातील तासगाव सांगली रोडवरील कुमठे फाटा येथे ही घटना घडली ज्यामध्ये दुचाकी वरील आई आणि तिच्या दोन मुलांचा दुर्दैवी रित्या जागीच मृत्यू झाला तर या घटनेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.
वडापणे दुचाकी ला उडवल्याने ही घटना घडली गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मिळालेली माहिती अशी दुचाकी वरील दांपत्य त्यांच्या मुलांसह सांगलीहून आटपाडीला निघाले होते कुमठे फाटा येथे दुचाकी आल्यानंतर वळणावर भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या वडापणे गाडीला ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीचे थेट दोन तुकडे झाले.
धडक एवढी जोरदार होती की, आई आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर पती देखील गंभीर जखमी असल्याने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती सांगितली जात आहे.











